अभ्यास कसा करावा


 अभ्यास कसा करावा ,मुलांनी अभ्यास आणि वेळेचे नियोजन कसे करावे .




अनेक लहान मुलांच्या पालकांना असा प्रश्न पडतो की अभ्यास कसा करायचा ,अभ्यास नियोजन कसे करावे किँवा अभ्यास किती वेळ करावा,तर मित्रांनो अशा प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी पुस्तक वगैरे नसते तर त्यासाठी तुम्हालाच काही बदल करावे लागतील . तेच बदल कोणते व कसे करावे या विषयीची माहिती तुम्हाला ह्या लेखा मध्ये देण्याचा हा प्रयत्न ,

बहुतांश मुलांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम होतो,म्हणजे जर अभ्यासाचे नियोजन नसेल आणि व्यवस्थित अभ्यास नसल्यामुळे परीक्षेत नापास होणे किंवा हुशार असून देखील कमी मार्क पडणे असे प्रकार होतात . हे टाळण्यासाठी अभ्यास कसा करावा हे शास्र तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे . चला तर मग अभ्यास कसा करायचा या बाबत काही टिप्स जाणून घेऊयात .


 

#मार्गदर्शक टिप्स -

प्रत्येकाची अभ्यास करण्याची वेगवेगळी पद्धत असते ,काही ठराविक पण उपयुक्त टिप्स तुम्हाला खाली दिलेल्या आहेत . यातील निवडक टिप्स जरी तुम्ही अंगिकारल्या तरी त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल . 


१. एकाग्रतेने अभ्यास कसा करावा 


तुम्ही अभ्यास करायला बसला की तुम्हाला नाही ,नाही ती कामे आठवतात आणि मग अभ्यासात मन लागत नाही . यांसारख्या गोष्टीपासून स्वतःला वेगळे ठेवण्यासाठी तुमचा तुमच्या मनावर ताबा असणे गरजेचे आहे . 

करावा एकाग्रतेने केलेली कोणती ही गोष्ट उत्तमच होत असते आपण एकाग्रतेने केलेला अभ्यास हा तुमच्या कायम लक्षात राहील व त्याची अनुभूती तुम्हाला परीक्षा देताना येईल .

 काही जणांनापहाटे उठून अभ्यास करायची सवय असते तर काहींना रात्रीची जागून अभ्यास करायची सवय असते . तुमच्या अभ्यास करण्याची वेळ ही नेहमी अशी असावी ज्यावेळी तुम्हाला नको ते नको त्या मनोरंजनाच्या गोष्टी आठवणार नाहीत आणि जर तुम्ही रात्रीचे जागून अभ्यास केला तरी तुम्ही काही करायचे म्हटले तरी करू शकत नाही . ज्यामुळे अभ्यासात व्यत्यय येत नाही .  

२] अभ्यास किती वेळ करावा -


अभ्यास किती वेळ करावा असे काही ठरवून करू नका . जोपर्यंत तुमचा मेंदू पूर्णपणे त्या वाचनातील किंवा लिखाणातील गोष्टींमध्ये रमतो आहे तोपर्यंत अभ्यास करावा. जसे बराच वेळ काम केल्यानंतर किंवा व्यायाम केल्यावर तुमचे शरीर दमते आणि त्याला आरामाची गरज असते . अगदी तसेच तुमच्या मेंदूला देखील ठराविक कालावधी नंतर थोड्या विश्रांतीची गरज असते .


तुम्ही अभ्यास करताना असे जरूर ठरवा की आज मी हा अमुक तमुक धडा किंवा टॉपिक पूर्ण संपवेन ,आणि मग बघा तुमचे शरीर आणि मेंदू एकत्रित पणे ते काम पूर्ण करण्यासाठी काम करतील . परंतु तुम्ही जर इतके तास अभ्यास करायचेच असे जर ठरवले तर त्या मध्ये तुमचा म्हणावं तेवढा अभ्यास होणार नाही ,त्यामुळेच तुम्ही अभ्यास किती वेळ करता याला महत्व नाही तर तो कसा करता ते महत्वाचे आहे . 

Comments

Post a Comment